SBI च्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवा फक्त 444 दिवस पैसे अन् मिळवा आकर्षक व्याज, जाणून घ्या सविस्तर

जीवनात बचत ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. जर आपण भविष्यासाठी बचत केली नाही तर, खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण सतत बचत करणे देखील शक्य होत नाही. म्हणजेच काही लोक महिन्याला पैसे गुंतवतात. तर काही लोक वर्षाला किंवा सहा महिन्याला. तसेच कधी कधी आपल्याकडे एकदम पैसे येतात तेव्हा ते पैसे काय करायचे हे सुचत नाही. जर या पैशाची योग्य गुंतवणूक झाली तर भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. यासाठीच तुम्ही एफडी करू शकता. आज आम्ही तुम्हाला SBI च्या FD योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

Amrit Vrishti SBI FD Scheme

अमृत वृष्टि फिक्स्ड डिपॉजिट योजना

देशातील सार्वजनिक बँकांपैकी एक असलेली SBI बँक ग्राहकांना खूप सुविधा देते. ही बँक ग्राहकांसाठी ‘अमृत वृष्टि’ फिक्स्ड डिपॉजिट (FD) ही खास एफडी योजना चालवत आहे. अमृत वृष्टि’ ही एक मुदतठेव योजना आहे. या योजनेत रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला चांगले आकर्षक रिटर्न मिळतो. SBI ची ही योजना आता 444 दिवसांसाठी सुरू आहे. मात्र या योजनेच्या व्याजदरात आता बदल करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

रेपो रेटमुळे व्याजदरात कपात

अलीकडेच रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे देशातील अनेक बँकांनी त्यांच्या FD योजनेवरचे व्याजदर कमी केले आहेत. या बँकाप्रमाणे SBI ने देखील व्याजदरात कपात केली आहे. आता नवीन व्याजदरामुळे ग्राहकांना या योजनेत थोडे कमी उत्पन्न मिळणार आहे. परंतु तरी देखील ग्राहकांना ही योजना परवडणारी आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये नक्कीच रक्कम गुंतवून त्याचा फायदा घेऊ शकता.

सामान्य नागरिकांसाठी असलेले व्याजदर

पूर्वीचा दर – 7.25% प्रति वर्ष
आताचा दर – 7.05% प्रति वर्ष

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले व्याजदर

पूर्वीचा दर – 7.75% प्रति वर्ष
आताचा दर – 7.55% प्रति वर्ष

मुदतपूर्व रक्कम काढल्यास दंड

तुम्ही जर 5 लाखांपर्यंत गुंतवणूक केली तर, तुम्हाला मुदतीपूर्वीच रक्कम काढायची असेल तर त्यावर तुम्हाला 0.50% दंड आकारला जाईल. तसेच तुम्ही जर 5 लाखांपेक्षा अधिक आणि 3 कोटींपर्यंतच्या FD साठी जर मुदतीपूर्वी रक्कम तुम्हाला काढल्यास 1% दंड भरावा लागेल, असे या योजनेचे नियम आहेत. 

2 thoughts on “SBI च्या ‘या’ एफडी योजनेत गुंतवा फक्त 444 दिवस पैसे अन् मिळवा आकर्षक व्याज, जाणून घ्या सविस्तर”

Leave a Comment