खरीप हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळणार पिक विम्याची रक्कम? ‘असा’ असेल फॉर्म्युला

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शेतात पिकाची पेरणी केल्यापासून ते पिक निघेपर्यंत सर्वच शेतकऱ्याच्या हातात येईल असे नसते. कारण अनेकदा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जातो. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिकासाठी विमा कवच दिले जात आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना चालवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आता याच संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

शेतकऱ्यांसाठी पिक विमा रक्कम

काढणी पश्चात झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडून राज्य शासनाकडे बोट दाखवले जात आहे. याच कारणास्तव राज्यातील जवळपास 73 हजार 718 शेतकऱ्यांचे तब्बल 82 कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी खाते व विमा कंपन्यांकडे चौकशीसाठी चकरा माराव्या लागत आहेत.  आता शेतकऱ्यांचा अडकलेल्या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना कशाप्रकारे मिळेल? त्याचा फॉर्म्युला कसा आहे ते पाहुयात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

शेतकरी बांधवांच्या पिकांच्या सौरक्षणासाठी राज्य सरकारची तार कुंपण योजना

शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम रखडली

तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये पिक नुकसान भरपाईसाठी 22 हजार 498 शेतकऱ्यांसाठी जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पिक काढणी पश्चात नुकसानीसाठी 51 हजार 226 शेतकऱ्यांना जवळपास 80 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर आता विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पिक विमा वाटपासाठी 80- 20 चा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

मागेल त्याला पी व्ही सी पाईप, वाचा पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना सविस्तर

शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाचा फॉर्म्युला कसा आहे?

80- 20 चा फॉर्म्युला म्हणजे विमा कंपनीला सरकारच्या माध्यमातून 100 टक्के रक्कम देण्यात आली तर कंपनीने 20 टक्के रक्कम स्वतः ठेवायची आणि शेतकऱ्यांना त्यातील 80 टक्के रक्कम वाटप करणे, असा आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पीक नुकसान भरपाईसाठी रक्कम कधी मिळेल याकडे डोळे लावून बसले आहेत. जर ही रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना पुढच्या हंगामासाठी पिक विम्यासाठी क्लेम करता येईल. 

Leave a Comment