महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

Maha DBT – शेतकऱ्यांनो, केंद्र व राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या (mahadbtmahait.gov.in) माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांवर अनुदान दिलं जातं. यामध्ये ट्रॅक्टर, अवजारे, ठिबक सिंचन व्यवस्था, कीटकनाशके, बियाणे, शेती औषधे, पाण्याच्या पंपसह अनेक घटकांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी हजारो शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात. यंदाच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठीही शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यावर्षी अर्ज प्रक्रियेमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे आवश्यक आहे.

Maha DBT Update
Maha DBT Update

सध्या महाडीबीटी पोर्टलवरून नवीन अर्ज भरता येत नाहीत कारण पोर्टल तात्पुरते बंद करण्यात आले आहे. शासनाने याबाबत अधिकृत सूचना पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, “प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनी, महाडीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल.”

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

म्हणजेच, अद्याप 2025-26 साठीच्या योजना सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना फक्त अर्जदार लॉगिनचा टॅब उपलब्ध असून, फक्त यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आपला अर्जाचा स्टेटस तपासता येतो. नवीन फॉर्म भरता येत नाहीत.

मोबाईलवरून पाहा तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे!

महत्वाची बाब म्हणजे यावर्षीपासून अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी अर्जांची निवड लॉटरी पद्धतीने केली जायची. पण आता ती पद्धत रद्द करण्यात आली आहे. याऐवजी शासनाने “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” ही नवीन कार्यपद्धती लागू केली आहे.

म्हणजे जो शेतकरी सर्वात आधी अर्ज भरेल त्याला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे अर्जाची तारीख आणि वेळ अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 2025-26 मध्ये अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी पोर्टल सुरु होताच तत्काळ अर्ज करणे आवश्यक आहे.

अनेक शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की, पूर्वी जे अर्ज भरले होते त्याचं काय होणार? तर शासनाने यावर सुद्धा स्पष्टता दिली आहे. Maha DBT Update

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत, आता मिळणार 30-40 हजार रुपये?

याआधी भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. त्या अर्जांची यादी तयार करण्यात आली असून, अर्जाची तारीख व वेळ यानुसार क्रमवारी लावण्यात आली आहे. ही यादी शेतकऱ्यांनी mahadbt पोर्टलवर ‘शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी’ या टॅबवर क्लिक करून तपासता येते.

शेतकऱ्यांनो, ही माहिती फक्त माहितीपुरती मर्यादित नाही तर तुमचं भविष्य ठरवणारी ठरू शकते. कारण यंदा “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” दिलं जात असल्यामुळे, जो शेतकरी वेळेवर अर्ज करेल त्यालाच अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे Maha DBT पोर्टल सुरु होताच कुठलाही विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.